

‘शाब्बास वहिनी’मध्ये प्रिया सुर्वे मानकरी
जोगेश्वरी, ता. १२ (बातमीदार) : महिला दिनाचे औचित्य साधून जोगेश्वरीमध्ये शाब्बास वहिनी स्पर्धेची अंतिम फेरी नुकतीच मोठ्या धूमधडाक्यात पार पडली. या स्पर्धेत मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्रातून (शाख क्रमांक ७७) च्या प्रिया स्वप्नील सुर्वे या ‘शाब्बास वहिनी-२०२५’च्या मानकरी ठरल्या. त्यांना पैठणी, सोन्याची नथ, ट्रॉफी तसेच क्राऊन देण्यात आला. अंतिम फेरीसाठी निवडण्यात आलेल्या १२ जणींमधून त्यांची निवड करण्यात आली.
दरवर्षी आमदार रवींद्र वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मनीषा वायकर यांच्या आयोजनाखाली शाब्बास वहिनी स्पर्धेचे आयोजन केले जाते. या स्पर्धेत वक्तृत्व, पाककला, क्रिकेट, एक मिनिट स्पर्धा, नृत्य स्पर्धा, फॅशन शो, फन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात आल्या. प्राथमिक स्पर्धेतून निवडण्यात आलेल्या स्पर्धकांची अंतिम फेरी ९ मार्च रोजी श्याम नगर तलाव, दत्ताराम गोविंद वायकर मार्ग येथे पार पडली. यानिमित्ताने समाजातील विविध क्षेत्रात स्व-कर्तृत्वावर स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या महिलांना स्त्री-सन्मान पुरस्कार-२०२५ देऊन गौरवण्यात आले. यामध्ये गायिका वैशाली भैसाने-माडे, आयुर्वेदिक क्षेत्रातील अभ्यासक डॉ. शुभदा देशमुख, पंचकर्म, आयुर्वेद, योगसाधिका डॉ. देविका देशमुख, सेवानिवृत्त वरिष्ठ प्रबंधक, हिंदुस्थान पेट्रोलियम स्मिता गुमास्ते यांना स्त्री-सन्मान पुरस्काराने गौरवण्यात आले. या वेळी खासदार रवींद्र वायकर, शिवसेना नेत्या मीनाताई कांबळे, शीतल म्हात्रे, ज्योती कदम, दिव्या कदम, मनीषा वायकर, नगरसेविका राजूल पटेल, चंद्रावती मोरे, ज्ञानेश्वर सावंत, स्वप्नील टेंबवलकर, वैभव भराडकर, अल्ताब पेवेकर, रचना सावंत, प्रियांका अंबोळकर, दीप्ती वायकर-पोतनीस, विनय सावंत, प्राजक्ता वायकर-महाले, प्रियांका पेडणेकर, पूजा शिंदे, सूचिता टक्के आदी उपस्थित होते.
सोबत छायाचित्र - ‘शाब्बास वहिनी-२५’च्या मानकरी ठरलेल्या प्रिया स्वप्नील सुर्वे यांचा सत्कार करताना मनीषा वायकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.