वाशी ते मानखुर्द प्रवास होणार जलद

वाशी ते मानखुर्द प्रवास होणार जलद

Published on

वाशी, ता. १२ (वार्ताहर) : सायन-पनवेल मार्गावरील वाशी खाडी पुलावरून मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांचा प्रवास आता सुखाचा आणि जलद होणार आहे. वाशी खाडी पुलावर उभारण्यात येत असलेल्या नवीन उड्डाणपुलांपैकी वाशीकडून मानखुर्दच्या दिशेला येणाऱ्या पुलाचे काम पूर्ण झाले आहे. लवकरच हा पूल प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असल्याची माहिती एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली.
वाशी खाडी पुलावरील वाहतूक कोंडी कमी व्हावी याकरिता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) वाशी खाडी पुलावर दोन नवीन पूल बांधण्यात आले आहेत. प्रत्येक पुलावर तीन मार्गिका आहेत, ज्यामुळे वाहतूक अधिक सुरळीत होणार आहे. या प्रकल्पासाठी एकूण ५५९ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. पुलांची लांबी १८३७ मीटर असून, मुंबईकडील पोहोच मार्ग ३८० मीटर आहे. यापूर्वी मानखुर्दहून वाशीकडे जाणारा पूल ऑक्टोबरमध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. त्यानंतर आता वाशीकडून मानखुर्दच्या दिशेला जाणारा पूलही पूर्ण झाला आहे. यामुळे भविष्यात वाहतूक कोंडी कमी होईल आणि वाशी ते मानखुर्द प्रवास जलद होऊन वेळेची बचत होईल, अशी आशा एमएसआरडीसीचे अधिकारी आणि वाहनधारकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
------------------
दोन पुलांची बांधणी
१९९४ पासून सायन-पनवेल मार्गावरून वाहतूक करण्यासाठी वाशी खाडीवर सहापदरी पूल कार्यरत आहे; परंतु वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे हा पूल अपुरा पडत होता. संध्याकाळच्या वेळेस या पुलावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनचालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत होता. वाहनचालकांची ही समस्या लक्षात घेऊन एमएसआरडीसीकडून वाशी खाडी पुलावर दोन नवीन पूल बांधण्यात आले आहेत.
----------------
प्रवाशांना फायदा
वाशी ते मानखुर्ददरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी हे नवीन पूल अत्यंत फायदेशीर ठरतील. या पुलांमुळे प्रवासातील वेळ कमी होईल. वाहतूक कोंडीमुळे होणारा मनस्तापही कमी होईल. वाशी खाडी पुलावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हे नवीन पूल बांधण्यात आले आहेत. या पुलांमुळे वाहनचालकांचा प्रवास सुखकर होईल, अशी अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com