तळोजा-घोट रस्त्यावर अपघाताची भीती
खारघर, ता. १२ (बातमीदार) : तळोजा फेज दोनकडून घोटगावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या पुलावरील काही भाग खचला आहे. या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता असून महापालिकेने रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी रहिवाशांकडून केली जात आहे. तळोजा फेज दोनकडून घोटगाव आणि तळोजा एमआयडीसीकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. शिवाय हा रस्ता अरुंद असून दोन्ही बाजूने भरधाव वेगाने वाहन धावत असतात. रस्त्यावर खड्डा पडून दोन वर्षे झाले तरीही पालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास येत नसल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी या रस्त्यावर अंधार असतो. भरधाव येणाऱ्या वाहनचालकांचा वाहनावरील नियंत्रण सुटल्यास अपघात होण्याची भीती वर्तवली जात आहे. पनवेल पालिका प्रशासनाने लक्ष देऊन पुलाची दुरुस्ती करून पुलाच्या दोन्ही बाजूला संरक्षण कठडा अथवा लोखंडी पाईप लावण्यात यावेत, अशी मागणी वाहनचालकांकडून व रहिवाशांकडून केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

