आशासेविकांवर माथेफिरूचा हल्ला
उल्हासनगर, ता. १२ (वार्ताहर) : उल्हासनगर महापालिकेच्या क्षयरोग आणि कुष्ठरोग सर्वेक्षणासाठी झोपडपट्टी भागात गेलेल्या दोन आशासेविकांवर माथेफिरूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना उल्हासनगरच्या भरतनगर परिसरात घडली. या हल्ल्यात दोघी सेविका जखमी झाल्या असून, घटनेमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उल्हासनगर महापालिकेच्या वतीने दोन आशासेविका मंगळवारी दुपारी भरतनगर परिसरात क्षयरोग आणि कुष्ठरोगाच्या सर्वेक्षण करत होत्या. या दरम्यान त्या एका व्यक्तीच्या घरी गेल्या असता त्याने संतापाने अश्लील भाषेत शिवीगाळ करत हल्ला केला. पहिल्या आशासेविकाच्या केसांना धरून डोक्यात फरशीचा तुकडा मारला. दुसऱ्या आशासेविकेला नखांनी ओरबडत तिलाही मारहाण केली. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे दोघी सेविका घाबरल्या होत्या. त्यांनी स्वतःची सुटका करून उल्हासनगरच्या शासकीय रुग्णालयात पोहोचल्या. प्राथमिक उपचार घेतल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. या घटनेमुळे आशासेविकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. अल्प मानधनावर जनतेच्या आरोग्यासाठी अहोरात्र सेवा देणाऱ्या या महिला आज स्वतःच्या सुरक्षिततेसाठी चिंताग्रस्त झाल्या आहेत. प्रशासनाने तातडीने या प्रकरणात हस्तक्षेप करून कडक कारवाई करण्याची गरज आहे.
प्रशासनाचे आश्वासन
उल्हासनगर महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. मोहिनी धर्मा यांनी सांगितले की, आशासेविकांनी घाबरू नये. प्रशासन त्यांच्यासोबत आहे. याप्रकरणी कठोर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनीही त्यांना सहकार्य करावे आणि अशा घटनांना थारा देऊ नये.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

