

टोकावडे, ता.१२ (बातमीदार)ः मुरबाड तालुक्यातील दुधनोली आदिवासी गावातील दीपक घिगेने नोकरीपेक्षा शेतीला प्राधान्य दिले आहे. बी.ए. बीएड उर्तीर्ण असताना शिक्षक होण्याएेवजी आधुनिक शेतीतून चांगले उत्पन्न मिळवले आहे.
दुधनोली या गावातील दीपक घिगेने इतिहास विषयात बी.ए.बीएड शिक्षण घेतले आहे. परंतु, शिक्षण क्षेत्रातील परिस्थितीचा विचार करून शेतीतील आधुनिक पद्धतीने वेगवेगळी पिके घेऊन नवनवीन पिके घेण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी त्याने आदिवासी विकास प्रकल्प शहापूर यांच्याकडून शेततळ्याचे अनुदान घेऊन शेततळे तयार केले आहे. तसेच विहीर, बोअरवेल याचाही वापर करून आधुनिक पद्धतीने ठिबक सिंचन पद्धतीचा वापरातून काकडी, भेंडी, टॉमेटो या पिकांबरोबर शिमला मिरची, कोबी, फ्लॉवर अशा अंतर्गत पिकातून चांगले उत्पन्न मिळवले आहे.
-------------------------------------
विविध पुरस्कारांचा मानकरी
दीपक घिगेच्या कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल २०१७ साली तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याहस्ते वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच २०१८ मध्ये ठाणे जिल्हा परिषद कृषी विभागाकडून प्रगतिशील शेतकरी पुरस्कार ही देण्यात आला आहे. याचबरोबर कृषी विभागाच्या शेतीविषयक विविध प्रशिक्षण शिबिरातून त्याने नवनवीन प्रयोगाबाबत मार्गदर्शनही केले आहे.
--------------------------------------------
बीए.बीएड शिक्षण पूर्ण केले आहे. पण नोकरी मिळाली नसल्याने अखेर आधुनिक पद्धतीने शेती पिकवण्याचा निर्णय घेतला.
- दीपक घिगे, प्रगतिशील शेतकरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.