डोंबिवलीतील रस्ते धुळीने माखले
डोंबिवलीतील रस्ते धुळीने माखले
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १२ : शहरात रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण, गटार बांधणी, सेवावाहिन्या टाकण्याची कामे सुरू आहेत. ही कामे पूर्ण झाल्यानंतर रस्त्यांची झाडलोट केली जात नसल्याने रस्ते धुळीने माखले आहेत. यामुळे परिसरातील नागरिक त्रासले आहेत. पालिका प्रशासनाने रस्त्यांवरील धुळीवर उपाय म्हणून दोन धूळ संयंत्र नियंत्रक मशीन घेतल्या आहेत; मात्र ही वाहने कोठे फिरतात, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. रस्त्यांची दररोज झाडलोट व्हावी, कचरा उचलला जावा, अशी मागणीही करण्यात येत आहे.
डोंबिवली शहरात नादुरुस्त रस्ते आणि सिमेंट काँक्रीटीकरण केलेल्या रस्त्यांवर धुळीचे साम्राज्य आहे. अनेक भागात रस्त्यांची, गटार बांधणीची तसेच सेवावाहिन्या टाकण्याची कामे सुरू आहेत. ही कामे झाल्यानंतर रस्त्यांची झाडलोट होणे आवश्यक आहे; मात्र ती होताना दिसत नाही. महिनोंमहिने रस्त्याच्या कडेला पेव्हर ब्लॉक, सिमेंट, रेती- वाळूचे ढीग असतात. कामाच्या ठिकाणी रस्त्यावर पडलेली माती, सिमेंटचा थर हा तसाच पडून असतो. रस्त्याच्या कडेला असलेली दुकाने, इमारतीमधील नागरिकांच्या घरात ही धूळ जात असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. पालिका प्रशासनाने रस्त्यावरील धूळ साफ होण्यासाठी, वायू प्रदूषण कमी करण्यासाठी धूळ संयंत्र नियंत्रक मशीन खरेदी केल्या आहेत; मात्र हे मशीन ठरावीक रस्त्यांवरच कधी तरी चालवले जातात. डोंबिवली शहरातील रस्त्यांवर ते दिसतच नाहीत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

