कल्याण -डोंबिवली

कल्याण -डोंबिवली
Published on

इनरव्हील क्लबची पॉज संस्थेला रुग्णवाहिकेची भेट
डोंबिवली : डोंबिवलीतील इनरव्हील क्लब संस्था त्यांच्या ५० वर्षांच्या सेवेचा उत्सव साजरा करीत आहे. डोंबिवलीतील पॉज - वनस्पती आणि प्राणी कल्याण सोसायटीही प्राणी कल्याण आणि वन्यजीव संवर्धनात आपले २५वे वर्ष साजरे करीत आहे. इनरव्हील क्लबने यानिमित्ताने पॉज संस्थेला एक प्राणी रुग्णवाहिका भेट देऊ केली आहे. संस्थेच्या ५०व्या वर्षातील अध्यक्ष कला गणेश यांनी पॉजच्या सहसंस्थापक आणि सचिव अनुराधा रामास्वामी यांना रुग्णवाहिकेच्या चाव्या सुपूर्द केल्या. आंतरराष्ट्रीय इनरव्हीलच्या अध्यक्षा ममता गुप्ता, असोसिएशनच्या अध्यक्षा सुनीता जैन आणि जिल्हा अध्यक्षा प्रेरणा रायचूर यांच्या हस्ते या रुग्णवाहिकेचे उद्घाटन झाले. पॉज ही रुग्णवाहिका त्यांच्या दैनंदिन श्वान आणि मांजरीच्या बचावासाठी वापरणार आहे. पॉजने ठाणे जिल्ह्यातील प्राण्यांसाठी पहिली रुग्णवाहिका सुरू केली. आतापर्यंत ३० हजारपेक्षा अधिक पशु-पक्ष्यांची मदत केली आहे. तसेच वन्यजीव आणि भटक्या जनावरांसाठी पॉजकडे स्वतंत्र रुग्णवाहिका आहेत, असे पॉजचे संस्थापक डॉ. नीलेश भणगे यांनी सांगितले.
...................
नंदनवन सुंदर बाग स्पर्धेत जगदीश तरे द्वितीय
कल्याण (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली महापालिका व पर्यावरण दक्षता मंडळ, डोंबिवली यांनी नंदनवन सुंदर बाग स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत टेरेस गार्डन (किचन गार्डन) या प्रवर्गात कल्याण पूर्वेतील खडेगोळवलीतील रहिवासी जगदीश तरे यांनी द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे. महापालिका उपायुक्त व मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र, सन्मानचिन्ह आणि रोपटे देऊन तरे यांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी उद्यान अधीक्षक अनिल तामोरे, डॉ. अंजली, रूपाली शाईवाले व सर्व सदस्य उपस्थित होते.
..................
तारांगण सोसायटीत महिलादिन कार्यक्रम
डोंबिवली : जिमखाना रोड डोंबिवली पूर्व येथे महिलादिनानिमित्त महिलांसाठी विविध उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी ७० ते ८० महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमांत गाणी, भाषण आणि खेळ महिलांसाठी घेण्यात आले. विशेष करून, महिलांचा या कार्यक्रमात लेझीम पथक होते आणि या कार्यक्रमामध्ये नेसले कंपनीने प्रत्येक बहिणीला सरप्राईज दिले. अतिशय उत्तमरीत्या हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमात सकाळ वार्षिक वर्गणीदार योजनेची पत्रके वाटप करून माहिती देण्यात आली.
...............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com