भांडूपमधील कक्कया शेट्टी मार्गावरील ७५ अनधिकृत बांधकामे निष्कासित

भांडूपमधील कक्कया शेट्टी मार्गावरील ७५ अनधिकृत बांधकामे निष्कासित
Published on

भांडुपमधील कक्कय्या शेट्टी मार्गावरील ७५ अनधिकृत बांधकामे निष्कासित
तीन मीटर अरुंद रस्ता झाला १८ मीटर रुंद; दोन किलोमीटरपर्यंतच्या फेऱ्यापासून नागरिकांची सुटका
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ ः मुंबई महापालिकेच्या एस विभाग हद्दीतील भांडुप पश्चिम परिसरात कक्कय्या शेट्टी मार्गावरील ७५ अनधिकृत बांधकामे आज (ता. १२) निष्कासित करण्यात आली आहेत. यामध्ये ६२ घरे आणि १३ दुकानांचा समावेश आहे. या कारवाईमुळे हिंद रेक्टिफायर कंपनी ते कक्कय्या शेट्टी हा तीन मीटर अरुंद असलेला मार्ग आता १८.३० मीटर इतका रुंद झाला आहे.
मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. उपआयुक्त (परिमंडळ ६) संतोषकुमार धोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि एस विभागाचे सहाय्यक आयुक्त भास्कर कसगीकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. यासाठी दोन बुलडोझर, दोन जेसीबी, दोन इतर वाहने, ८० कामगार, ३० अभियंते, १५ पोलिस इतका फौजफाटा तैनात होता.
निष्कासित करण्यात आलेली ७५ बांधकामे तळमजला आणि त्यावर एक मजला अशा स्वरूपाची होती. त्यात ६२ घरे व १३ दुकाने होती. या ठिकाणी पात्र राहणाऱ्या नागरिकांचे यापूर्वीच पुनर्वसन करण्यात आले आहे.

वाहतूक कोंडीतून सुटका
हिंद रेक्टिफायर कंपनी ते कक्कय्या शेट्टी मार्ग या रस्त्यावर अतिक्रमणांमुळे हा मार्ग अरुंद झाला होता. त्यामुळे लालबहाद्दूर शास्री मार्गाकडे जाताना एकावेळी एकच वाहन जात होते. तसेच अनेक नागरिकांना गावदेवी, तुळशेतपाडा या ठिकाणी जाताना दोन किलोमीटरचा फेरा पार करून जावे लागत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com