अग्रोली गावामध्ये अनधिकृत पार्किंगची समस्या

अग्रोली गावामध्ये अनधिकृत पार्किंगची समस्या

Published on

अग्रोली गावामध्ये अनधिकृत पार्किंगची समस्या
तुर्भे, ता. १२ (बातमीदार) ः शहरातील वाढत्या लोकसंख्येबरोबरच येथील वाहनांची संख्याही वाढत आहे; परंतु त्यादृष्टीने पार्किंगची सुविधा नसल्याने विविध समस्या निर्माण होत आहे. पार्किंगअभावी कोठेही वाहने पार्क केली जात असल्याने वाहतुकीचे नियोजन बिघडले आहे. असाच प्रकार आग्रोली गावातील समाज मंदिर शेजारी पहायला मिळत आहे. याठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला बेशिस्त पार्किंग सुरू झाली आहे. ही पार्किंग अपघाताला निमंत्रण देत आहे. ही पार्किंग हटविण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येऊ लागली आहे.
मागील काही महिन्यांपासून अग्रोली गावातील उड्डाणपूलाखाली असणाऱ्या समाज मंदिराशेजारी मोठ्या प्रमाणात वाहने पार्क केली जात आहेत. ग्रामस्थांकडे वाहन पार्किंगसाठी जागा असल्याने याठिकाणी आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांकडून अवैध गाड्या पार्क केल्या जात असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. पार्किंगच्या जागेसाठी सध्या बहुतांश ठिकाणी स्पर्धा सुरू असल्याचे पहावयास मिळत आहे. पार्किंगला जागा नसल्याने मिळेल तिथे वाहने पार्क केली जात आहेत. ब्रिजवरून अग्रोली गावात प्रवेश करतानाच बेकायदा रस्त्यावर दुतर्फा वाहने पार्क केली जात आहेत. दोन दिवसांपूर्वी या ठिकाणी दोन अपघाताच्या घटना घडल्या होत्या. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच कायम याठिकाणी किरकोळ अपघात होत असतात. दिवसेंदिवस याठिकाणी वाहन पार्किंग करणाऱ्या वाहनांची संख्या वाढू लागली आहे. याठिकाणी दुचाकी, चार चाकी, टेम्पो अशी वाहने दररोज पार्क केली जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com