एमडी पावडरच्या विक्रेत्याला अटक

एमडी पावडरच्या विक्रेत्याला अटक
Published on

भिवंडी, ता. १२ (बातमीदार) : भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने एमडी पावडरच्या विक्रीसाठी आलेल्या एकाला अटक केली आहे. एजाज अहमद निसार अहमद अन्सारी (५७) असे अटक केलेल्या विक्रेत्याचे नाव आहे.
कासिमपुरा रोड येथील बाबा हॉटेलजवळील निझामुन कंपाउंडमध्ये राहणारा एजाज अमली पदार्थांची विक्री करीत असल्याची माहिती गुन्हे शाखा घटक दोनच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने मंगळवारी (ता. ११) रात्री अवचितपाडा येथील कासिमपुरा कब्रस्तान येथून एजाजला ताब्यात घेतले. त्याच्याकडे ५८ ग्रॅम वजनाची एक लाख ९३ हजार ५०० किमतीची एमडी पावडर सापडली आहे. तसेच, त्याच्याकडून मोबाईल फोनही जप्त केला आहे. याप्रकरणी शांतिनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com