लेखी आश्वासनानंतर बेमुदत उपोषण मागे

लेखी आश्वासनानंतर बेमुदत उपोषण मागे
Published on

वाडा, ता. १२ (बातमीदार) : तालुक्यातील अंभई ग्रामपंचायतीत विकासकामे करताना ती नियमबाह्य करण्यात आली असून त्यात भ्रष्टाचार झाल्याचा दावा ग्रामस्थांनी करीत ५ मार्चपासून तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. अखेर सातव्या दिवशी या उपोषणाची पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी दखल घेतली. गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आज (ता. १२) ग्रामस्थांनी उपोषण मागे घेतले.

अंभई ग्रामपंचायतीमध्ये पदाधिकारी, अधिकारी यांनी गैरव्यवहार केल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. वस्तूंची खरेदी करताना मनमानी अंदाजपत्रक, निकृष्ट कामाचा दर्जा, छुप्या मार्गाने निविदा काढून आपल्या मर्जीतील कंत्राटदारांना कामे देणे, असे विविध दावे करण्यात आले आहेत. ग्रामपंचायतीच्या या भ्रष्ट कारभाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांनी उपोषण सोडण्याची विनंती केली होती; मात्र कारवाईशिवाय उपोषण सुरूच ठेवणार, असा पवित्रा उपोषणकर्त्यांनी घेतला होता. अखेर सातव्या दिवशी मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी या उपोषणाची दखल घेतली. वाडा तालुक्याचे गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून त्यात उपअभियंता बांधकाम आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता यांची समिती स्थापन करून त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले.

उपोषणकर्त्यांना लेखी आश्वासन देण्यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर जगताप, तहसीलदार भाऊसाहेब अंधारे, गटविकास अधिकारी वैभव शिंदे, शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या ज्योती ठाकरे, नीलेश गंधे, गोविंद पाटील आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com