

वाशी, ता. १२ (वार्ताहर) : नवी मुंबई महापालिकेने २५ फेब्रुवारी २०२५ रोजी पालिका शाळांतील विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या इमॅजिका पार्क येथील सहलीत १४ वर्षीय आयुष सिंग या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. सहलीची निविदा न काढताच महापालिकेने सव्वाचार कोटींचा घोटाळा करण्याबरोरच नियमबाह्य सहल काढल्याचा आरोप मनसेचे प्रवक्ता व नवी मुंबई शहरप्रमुख गजानन काळे यांनी केला आहे.
विद्यार्थ्यांच्या सहलीसंदर्भात निविदा न काढताच एकल स्रोत पद्धतीचा अवलंब करून महापालिकेकडून सहलीचे कंत्राट देण्यात आल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे. या सर्व प्रक्रियेत तब्बल चार कोटी २३ लाखांचा घोटाळा झाल्याचे मनसेकडून सांगण्यात आले आहे. २०१६च्या शासन निर्णयानुसार शैक्षणिक सहल ऐतिहासिक, भौगोलिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक माहिती देणाऱ्या ठिकाणीच नेणे आवश्यक असताना, महापालिकेने विद्यार्थ्यांची ॲडव्हेंचर पार्कमध्ये सहल आयोजित का केली, असा सवाल मनसेकडून उपस्थित करण्यात आला आहे. या सहलीदरम्यान महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थी आयुष सिंगचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला, असे शवविच्छेदन अहवालात नमूद असले तरी पालिका अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळेच विद्यार्थ्याचा मृत्यू होण्याची परिस्थिती निर्माण झाल्याचे मनसेकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे शिक्षण विभाग संचालक आणि उपसंचालकांनी चौकशी समिती नेमून दोषींवर कठोर कारवाई करावी. तसेच उपायुक्त आणि शिक्षण अधिकाऱ्यांना निलंबित करावे, अशा प्रमुख मागण्या मनसेच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आल्या आहेत.
---------------------
दोन्ही कंत्राटे नियमबाह्य
महापालिकेने दुसरी ते पाचवीतील विद्यार्थ्यांच्या (२२ हजार ९८५ विद्यार्थी) सहलीसाठी एक कोटी ४४ लाख ४२ हजार रुपयांचे कंत्राट किडझेनियाला दिले आणि सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांच्या (१८ हजार ८६७ विद्यार्थी) सहलीसाठीची दोन कोटी ७९ लाख १५ हजारांचे कंत्राट इमॅजिका पार्क यांना देण्यात आले. काढलेली दोन्ही कंत्राटे निविदा न काढता नियमबाह्य असून, यात चार कोटी २५ लाख रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे. इतर अनेक पर्याय उपलब्ध असतानाही महापालिकेने एकल स्रोत पद्धतीने कंत्राट काढले असा आरोप करताना, हे कंत्राट नियमबाह्य असून अशा पद्धतीने कंत्राट काढता येत नसल्याचे सांगितले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.