

आदिवासी विकासच्या लिपिकांना अटक
शहापूर, ता. १२ (वार्ताहर) : आईच्या आजारपणातील वैद्यकीय भत्त्याची देयके मंजूर करण्यासाठी १५ हजारांची लाच स्वीकारताना शहापूर येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील दोघा वरिष्ठ लिपिकांना अटक करण्यात आली आहे. मंगळवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली.
मुरबाड येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेच्या स्वयंपाकी कर्मचाऱ्याच्या आईच्या आजारपणातील वैद्यकीय भत्त्याची पहिले तीन लाख २५ हजार तर दुसरे ५० हजारांची दोन देयके डिसेंबर २०२४ पासून प्रलंबित होती. ही देयके मंजूर करण्यासाठी वरिष्ठ लिपिक हरीश मराठे याने कनिष्ठ लिपिक हेमंत किरपण यांनी २३ हजारांची लाच मागितली होती; परंतु तडजोडीअंती ठरलेली १५ हजारांची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत विभागाने दोघांना अटक केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.