मुक्त विद्यापीठासाठी मनसे आक्रमक
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १२ : ठाणे महापालिकेने विद्यापाठासाठी आरक्षित केलेला भूखंड व्यावसायिक उपक्रमांसाठी वापरला जात आहे. या भूखंडावर कपडे आणि घरगुती वस्तूंच्या प्रदर्शनी भरवण्यात आली आहे. त्यामुळे मुळ उद्देशालाच हरताळ फासल्याचा आरोप करत मनसेने बुधवारी ठिय्या आंदोलन केले.
ठाणे पालिका प्रशासनाने पोखरण क्रमांक २, हिरानंदानीजवळील निहारिका संकुलाजवळ असलेला भूखंड यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाला कवडीमोल भावात भाडेतत्त्वावर दिला होता. शहरात विद्यापीठाचे केंद्र नसल्याने विद्यार्थ्यांना मुंबई किंवा अन्य ठिकाणी जाण्याची गरज भासू नये, हा यामागचा मुख्य उद्देश होता. या भूखंडावर विद्यापीठाची स्थापना करून ठाण्यातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याचा महापालिकेचा हेतू होता. गेल्या दहा वर्षांपासून हा भूखंड रिकामा होता. मात्र, आता या जागेचा वापर व्यावसायिक कारणांसाठी केला जात आहे. या भूखंडावर कपडे आणि घरगुती वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात आले असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स्वप्नील महिंद्रकर यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन देखील दिले होते. पण आयुक्तांनी निवेदनाची दखल घेतली नसल्याने यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठासाठी आरक्षित भूखंडाच्या बाहेर ठिय्या आंदोलन करत मनसे पदाधिकाऱ्यांनी निषेध केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

