वृत्तपत्र विक्रेत्यांवरील कारवाई थांबवावी!

वृत्तपत्र विक्रेत्यांवरील कारवाई थांबवावी!
Published on

वृत्तपत्र विक्रेत्यांवरील कारवाई थांबवावी!
आमदार सुनील शिंदे यांची विधान परिषदेत मागणी
मुंबई, ता. १२ ः मुंबईत दादर, सायन, चेंबूर परिसरात वृत्तपत्र विक्रेत्यांवर महापालिका तसेच पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. या कारवाईपासून वृत्तपत्र विक्रेत्यांचे संरक्षण करावे, अशी मागणी आमदार सुनील शिंदे यांनी विधान परिषदेत केली. त्याबद्दल बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाकडून आमदार शिंदे यांचे आभार मानण्यात आले.
वृत्तपत्र विक्रेते हे लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या माध्यम क्षेत्राचा महत्त्वाचा भाग आहेत. समाजाला सत्य माहिती वेळेवर पोहोचविण्याचे मोलाचे कार्य ते करीत असतात; मात्र मागील काही दिवसांपासून महापालिका आणि पोलिसांकडून सातत्याने वृत्तपत्र विक्रेत्यांवर कारवाई होत असल्याने त्यांच्या उपजीविकेवर परिणाम होत आहे. याबाबत आमदार सुनील शिंदे यांनी ११ मार्च रोजी विधान परिषदेत वृत्तपत्र विक्रेत्यांचा प्रश्न उपस्थित केला. शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे वृत्तपत्र विक्रेत्यांवरील कारवाई थांबवली जाईल, असा विश्वास बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाद्वारे त्यांचे आभार मानण्यात आले. संघटनेचे कार्याध्यक्ष मधुसूदन सदडेकर, सरचिटणीस संजय चौकेकर आणि खजिनदार रवींद्र चिले, जीवन भोसले यांनी शिंदे यांचे विशेष आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com