

धावत्या लोकलमधून पडून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू
कळवा, ता. १२ (बातमीदार) : कळवा-ठाणे रेल्वे स्थानकांदरम्यान धावत्या लोकलमधून पडून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता. ११) घडली.
कल्याणहून मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या जलद लोकल रेल्वेतून पडून अनिस अहमद (वय २६) याचा मृत्यू झाला. अनिस हा कल्याण पूर्वेतील पावसे नगर येथे राहत होता. अनिस हा मंगळवारी (ता. ११) सकाळी मुंबई येथे कामावर जात असताना गर्दीत दरवाजात लोंबकळत प्रवास करीत होता. कळवा रेल्वे स्थानक सोडल्यावर ठाण्याच्या दिशेने जात असताना त्याचा तोल जाऊन तो धावत्या लोकलमधून पडला. यामध्ये अनिस गंभीर जखमी झाला. या घटनेच्या माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत त्याला उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयात दाखल केले; मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याच्या कपड्यांमध्ये मिळालेल्या कागदपत्रांच्या माहितीवरून पोलिसांनी त्याच्या भावाशी संपर्क साधून त्याच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.