विक्रमगड पोलिसांकडून महिलांना मार्गदर्शन

विक्रमगड पोलिसांकडून महिलांना मार्गदर्शन

Published on

विक्रमगड (बातमीदार) : जनसंवाद अभियानअंतर्गत आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त विक्रमगड पोलिस ठाणे येथे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास विक्रमगड तहसीलदार चारुशीला पवार, विक्रमगड पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी रवींद्र पारखे, महिला दक्षता समिती अध्यक्षा सरस्वती नडगे-भोये आदी मान्यवर उपस्थित होते. पोलिस निरीक्षक रवींद्र पारखे हे महिलांना मार्गदर्शन करताना म्हणाले, की पालघर जिल्ह्यातील महिलांचे मनोबल वाढवण्यासाठी व त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी जनसंवाद अभियानांतर्गत महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. त्याअंतर्गत अल्पवयीन मुलींचे विवाह रोखण्यासाठी समुपदेशन, कौटुंबिक हिंसाचाराबाबत मार्गदर्शन, सायबर गुन्ह्यांबाबत जागृती, महिला अत्याचारासंबंधीचे कायदे याबाबत मार्गदर्शन, महिला बचत गट व करिअर मार्गदर्शन, महिला सुरक्षा आणि कौशल्य विकास आदी मार्गदर्शन करण्यात येते. चारुशीला पवार यांनी उपस्थित महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com