उल्हासनगरकरांवर पाणीटंचाईचे संकट

उल्हासनगरकरांवर पाणीटंचाईचे संकट
Published on

उल्हासनगरकरांवर पाणीटंचाईचे संकट
होळीचा जल्लोष करायचाय पण पाणीच नाही!
उल्हासनगर, ता. १२ ( वार्ताहर ) : रंगांची उधळण करण्यासाठी उल्हासनगरकर सज्ज झाले आहे; मात्र पाणीच नाही तर होळी कशी खेळणार, असा सवाल नागरिक करीत आहेत. त्यामुळे सणाच्या उत्साहावर पाणीटंचाईने विरजण घातले आहे. शहराच्या पाणीपुरवठ्याचा मुख्य व्हॉल्व बिघडल्यामुळे दोन दिवस उलटूनही नळाला थेंबभरही पाणी आलेले नाही. ऐन सणाच्या तोंडावरच शहर पाण्याविना तडफडत आहे, तर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांची तारांबळ उडाली आहे. प्रशासनाच्या दिरंगाईवर संताप व्यक्त केला जात आहे.

उल्हासनगरला बारवी धरणातून एमआयडीसीमार्फत पाणीपुरवठा केला जातो. कॅम्प नंबर ५ येथील आकाश कॉलनी, खडी मशीन परिसरात पाण्याचा मुख्य व्हॉल्व गेल्या दोन दिवसांपासून बिघडला आहे. यामुळे शहरात मंगळवार आणि बुधवार सलग दोन दिवस पाणीपुरवठा ठप्प राहिला. पालिकेने तातडीने दुरुस्तीचे काम सुरू केले असले तरी २४ तास उलटून गेले तरीही अद्याप काम पूर्ण झालेले नाही. होळीच्या सणाच्या दिवशी जर पाणीच नसेल, तर सण साजरा तरी कसा करायचा, असा सवाल संतप्त नागरिक विचारत आहेत. अनेकांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. वेळेवर देखभाल केली असती तर हा गोंधळ झाला नसता, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

नागरिकांमध्ये संभ्रम
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने व्हॉल्व दुरुस्तीचे काम सुरू ठेवले असले तरी पाणीपुरवठा कधी सुरू होणार, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही. त्यामुळे नागरिकांच्या मनात संभ्रम आहे. प्रशासनाने तातडीने हे काम पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे. उल्हासनगरकरांसाठी ही पाणीटंचाई महत्त्वाचा प्रश्न बनली आहे. आता प्रशासन किती तत्परतेने हा प्रश्न सोडवते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com