बारावीच्या विद्यार्थ्यांना फटका
अंबरनाथ, ता. १२ (वार्ताहर) : अंबरनाथमध्ये बारावीचा आयटी ऑनलाइन पेपर सुरू असतानाच वीज गेल्याने विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला होता. वीजच नसल्याने इन्व्हर्टरच्या बॅकअपवर या विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षा द्यावी लागल्याचे समोर आले आहे.
राज्यभरात बारावीच्या विद्यार्थ्यांची १२ आणि १५ मार्चला आयटी ऑनलाइनची परीक्षा आहे. ही परीक्षा शाळेतच होत असून, अंबरनाथ पश्चिमेकडील इकरा इंग्लिश स्कूलमध्ये सकाळच्या सत्रात पहिल्या बॅचची परीक्षा पार पडली. तर २.३०च्या सुमारास दुसऱ्या बॅचची परीक्षा सुरू होताच १५ मिनिटांतच वीजपुरवठा खंडित झाला. बारावीची परीक्षा असल्यामुळे वीजपुरवठा सुरळीत राहावा, यासाठी शाळेने महावितरणला आधीच लेखी स्वरूपात कळवले होते. असे असतानाही वीजपुरवठा खंडित झाल्याने विद्यार्थ्यांना इन्व्हर्टरच्या बॅकअपवरच परीक्षा द्यावी लागली. हा बॅकअप कोणत्याही क्षणी संपू शकतो. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला होता. दुसरीकडे वीजपुरवठा कधी सुरळीत होईल, याबद्दल महावितरणकडून कोणतीही माहिती शाळेला देण्यात आलेली नव्हती. इकरा इंग्लिश स्कूलबरोबरच फादर अग्नल, किंग लॉर्ड, फातिमा; तसेच अंबरनाथ पश्चिमेकडील इतर शाळांनाही महावितरणच्या या खेळखंडोबाचा फटका बसला. त्यामुळे शाळा प्रशासनही हतबल झालेले पाहायला मिळाले.
आम्ही महावितरणाला यासंदर्भात लेखी पत्र दिले असतानाही त्याची दखल घेतली नाही. महावितरणामुळेच आज विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे.
- आजरा सिद्दीकी, मुख्याध्यापिका, इकरा इंग्लिश हायस्कूल
मुख्य सबस्टेशन पडघा इथूनच वीजपुरवठा दुरुस्ती कारणास्तव खंडित करण्यात आला होता. याला आम्ही जबाबदार नाही.
- अलका कवले, महावितरण अभियंता
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

