रेल्वेच्या जनरल डब्यांची संख्या वाढणार
रेल्वेच्या जनरल डब्यांची संख्या वाढणार
खासदार पाटील यांचा यशस्वी पाठपुरावा
मुलुंड, ता. १२ (बातमीदार) : लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमध्ये जनरल आणि स्लिपर क्लासच्या डब्यांची संख्या वाढविण्याची मागणी ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील यांनी संसदेत केली होती. त्यांच्या या मागणीला रेल्वे विभागाने सकारात्मक प्रतिसाद दिला असून जनरल आणि स्लिपर क्लासच्या डब्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी १०,००० नवीन डबे वाढविण्याची योजना तयार करण्यात आली आहे. प्रवाशांची वाढती गर्दी कमी करण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या चालविण्यास सुरुवात केली आहे.
सध्याच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये जनरल आणि स्लिपर क्लासच्या डब्यांची संख्या कमी करून वातानुकूलित डब्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. यामुळे सामान्य नागरिकांना प्रवास करणे कठीण होत असल्याने खासदार संजय दिना पाटील यांनी १७ डिसेंबर रोजी संसदेत हा मुद्दा उपस्थित केला होता. नियम ३७७ अंतर्गत मांडलेल्या या मुद्द्यावर रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंह यांनी खासदार पाटील यांना पत्र पाठवून जनरल आणि स्लिपर क्लासच्या १०,००० डब्यांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती दिली आहे. यामुळे प्रवाशांना अधिक जागा मिळणार आहेत. याबरोबरच, अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी विशेष गाड्याही सुरू करण्यात आल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

