ठाणे पोलिसांकडून न्यायालयाचा अवमान

ठाणे पोलिसांकडून न्यायालयाचा अवमान

Published on

सक्षम सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात हलगर्जीचा आरोप
ठाणे शहर, ता. १२ (बातमीदार)ः आरोपीच्या कोठडीसह पोलिस ठाण्याच्या आवारात सर्व ठिकाणी सीसीटीव्ही लावा, अशी सर्वोच्च न्यायालयाची पोलिसांना ताकीद आहे. असे असताना ठाणे पोलिसांकडून त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप समाजसेवक, माहिती अधिकार कार्यकर्ते अजय जया यांनी केला आहे.
ठाणे आयुक्तालयातील पोलिस ठाण्यांमध्ये उच्च प्रतीच्या चित्रीकरणासाठी ७७० कॅमेरे बसवणे आवश्यक असताना, ठाणे आयुक्तालयातील पोलिसांनी केवळ चित्रीकरण करणारे ३५७ कॅमेरे बसवले आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा अवमान झाल्याचे कारण सांगत याबाबत न्यायालयात अवमान याचिका दाखल करणार असल्याचे अजय जया यांनी सांगितले. माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे पोलिस आयुक्तालयातील पोलिस ठाण्यांमध्ये अद्याप पूर्णतः सीसीटीव्ही आणि ऑडिओ रेकॉर्डिंग प्रणाली बसवलेली नाही. सर्वोच्च न्यायालयाने २०२० मध्ये सर्व पोलिस ठाण्यांमध्ये या प्रणालीचे कॅमेरे बसवण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. मात्र या आदेशाची ठाणे पोलिस विभागाने अंमलबजावणी केलेली नाही. अनेकदा पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवायला आलेल्या फिर्यादीलाच पोलिसांकडून दमदाटी केली जाते. आरोपीला नको त्या पद्धतीने मारहाण केली जाते. त्यामुळे मानवी अधिकारांचे उल्लंघन सर्रासपणे ठाण्यांमध्ये घडत असल्यानेच सर्वोच्च न्यायालयाने याचिकेची दखल घेतल्याचा दावा त्यांनी केला. तसेच पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत न्यायालयाच्या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करावी, असे आवाहन केले.
------------------------------
सीसीटीव्ही असल्याने पोलिस हॉटेल, सार्वजनिक ठिकाणी खबरदारीने वागतात. पोलिस ठाण्यात काही भागात त्यांनी कॅमेरे बसवलेले नसल्याने गैरकृत्य करण्याकरिता ही जागा सुरक्षित आहे. म्हणूनच पोलिस ठाण्यांमध्ये चित्रीकरणासह आवाज रेकॉर्ड केला जाईल, असे कॅमेरे बसवले नाहीत. याबाबत लोकांमध्ये विविध मार्गांनी जागृती केली जाईल.
- अजेय जया, सामाजिक कार्यकर्ता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com