संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर नष्ट करा
संभाजीनगरातील औरंगजेबाची कबर नष्ट करा
खासदार नरेश म्हस्के यांची मागणी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १२ : भारतीय संस्कृतीशी काही देणेघेणे नसलेल्या, पारतंत्र्य आणि क्रूरतेची निशाणी असलेल्या मुघल आणि ब्रिटिशांच्या वारशांचे आपण गेली ७५ वर्षे जतन करीत आलो आहोत. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणच्या संरक्षणाखाली तीन हजार ६९१ स्मारके आहेत. यापैकी २५ टक्के स्मारकांना कोणतेही राष्ट्रीय किंवा सांस्कृतिक महत्त्व नससल्याने भारतीय वारशांचे अधिक प्रमाणात जतन करण्यासाठी ब्रिटिश आणि मुघल प्रतीकांपासून देशाला मुक्त करावे, तसेच क्रूरकर्मा औरंगजेब याची कबर नष्ट करण्याची मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत केली आहे.
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिवस नुकताच झाला. ज्या क्रूरकर्म्याने छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मांतर करण्यासाठी अतोनात छळले, हजारो हिंदू धर्मियांची मंदिरे तोडली, धर्मांतरासाठी शिखांचे नववे धर्मगुरू तेजबहादूरसिंग यांना चांदनी चौक येथे मारले, दहावे धर्मगुरू गुरुगोविंदसिंग यांच्या दोन्ही मुलांना चार भिंतीआड मारले, अशा औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातील संभाजीनगर येथील खुलताबाद येथे आहे. त्या कबरीचे संरक्षण एएसआय करीत असून ही बाब संतापजनक असल्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितले. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही आपण ऐतिहासिक वारशांचे रक्षण करण्याच्या नावाखाली भूतकाळाचे ओझे वाहत आहोत. या संरक्षित स्मारकांमध्ये ब्रिटिश सैनिक आणि अधिकाऱ्यांच्या ७५ कबरी आहे. ज्यांचा भारताच्या सभ्यता आणि संस्कृतीशी काहीही संबंध नाही. त्यामुळे स्वातंत्र्यासाठी दिलेल्या बलिदानाचा आपण अवमान करीत असल्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

