नातवाला उचलून घेतले म्हणून बापाला मुलांकडून मारहाण
मुलाकडून वडीलांना लाकडाने मारहाण
ठाणे शहर (बातमीदार)ः दारूच्या नशेत नातवाला उचलून घेतल्याने मुलाने बापाला लाकडी फळीने मारहाण केल्याची घटना वागळे पोलिस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी घडली. वागळे इस्टेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत हजुरी गाव, शिवकृपा नगरात राहणारे रतन जाधव आणि दीपक जाधव यांचे सावत्र वडील जनार्दन शिंदे कळवा येथून नातवाला भेटण्यासाठी आले होते. मुलाला खेळण्यासाठी उचलण्यास गेलेल्या वडीलांना दीपकने मनाई केली.तरीही वडिलांनी एकदा नातवाला उचलण्याचा प्रयत्न केल्याने दीपक आणि मुलगा रतन तसेच आरोपीचा भाचा आशिष या तिघांनी जनार्दन शिंदे यांना हाताने आणि लाकडी फळीने मारहाण केली. या प्रकरणी वागळे स्टेट पोलिस ठाण्यात तिघांवर तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

