

होळीत नैसर्गिक रंगांची उधळण करा!
धारावी, ता. १२ (बातमीदार) : होळीचा आणि रंगपंचमीचा सण मुंबईकर उत्साहात साजरा करणार आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारच्या रासायनिक रंगांनी बाजारपेठा फुलून गेल्या आहेत. परंतु रासायनिक किंवा रसायनमिश्रित रंग न वापरता नैसर्गिक रंगांची उधळण करावी अथवा नैसर्गिक रंग वापरावे, असे आवाहन पक्ष्यांच्या संरक्षण व संवर्धनासाठी काम करणाऱ्या स्पॅरोज शेल्टर या संस्थेने नागरिकांना केले आहे.
रसायनमिश्रित रंगांऐवजी हळद, झेंडूची, पळसाची फुले, बेसन, मेंदी, कडुलिंबाचा पाला, मायाळू, कांद्याची साल, पांगारा, बिट यापासून घरच्या घरी नैसर्गिक रंग तयार करून रंगपंचमी साजरी करावी, असे आवाहन स्पॅरोज शेल्टरचे अध्यक्ष प्रमोद माने यांनी केले आहे. कुठेही जखमी पक्षी आढळ्यास अथवा चिमण्यांसाठी कृत्रिम घरटी हवी असल्यास ९८६७६३३३५५ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे संस्थेने आवाहन संस्थेने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.