लग्नाच्या भूलथापा देऊन महिलेची ३ लाखांची फसवणूक

लग्नाच्या भूलथापा देऊन महिलेची ३ लाखांची फसवणूक
Published on

लग्नाच्या भूलथापा देऊन महिलेची तीन लाखांची फसवणूक

कल्याण, ता. १२ (बातमीदार) : लग्नाच्या भूलथापा देऊन ३४ वर्षीय महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार कल्याण पश्चिमेकडील रामदासवाडी येथे घडला. याप्रकरणी कल्याण पोलिसांनी आरोपी मितेश नवथरे याच्यावर फसवणुकीचा गुन्हा मंगळवारी (ता. ११) सायंकाळी दाखल केला.
मितेश नवथरे याने पीडित महिलेला लग्‍नाचे प्रलोभन दाखवून तिच्याकडून ९ नोव्हेंबर २०२४ ते ५ जानेवारी २०२५ या काळात तीन लाख रुपये उकळले. त्यानंतर आरोपीने पीडितेशी लग्नास नकार दिला तसेच पैसे देण्यासही नकार दिल्याचे पीडितेने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. अखेर आपली फसवणूक झाल्याचे समजताच पीडितेने महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. महिलेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दरम्यान, आरोपी मितेश नवथरे हा मूळचा मध्य प्रदेश इथला राहणारा आहे. तो फरार असून आरोपीचा शोध सुरू असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com