मालमत्ता कराची थकबाकी २० हजार कोटी!
मालमत्ता कराची थकबाकी २० हजार कोटी!
महापालिकेची माहिती; बड्या आस्थापनांकडे मोठी रक्कम
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : पाचशे चौरस फुटांपर्यंतच्या घरांना दिलेल्या सवलतीच्या धोरणाचा मुंबई महापालिकेला आर्थिक फटका बसला असला तरी विविध प्राधिकरणे, संस्था, शासकीय तसेच निमशासकीय संस्था आणि विकसक तसेच गृहनिर्माण संस्था यांच्याकडे अनेक वर्षांपासून सुमारे २० हजार कोटी रुपये थकबाकी असल्याची माहिती पालिकेच्या कर निर्धारण आणि संकलक विभागाने दिली आहे.
महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत जकात होता. वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी झाल्यानंतर पालिकेला जकातीपासून मिळणारे उत्पन्न बंद झाले. जकातीपासून मिळणाऱ्या सुमारे नऊ हजार कोटींवर पालिकेला पाणी सोडावे लागले. त्यामुळे मालमत्ता करापोटी मिळणारा महसूल हाच पालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत बनला आहे. त्यामुळे पालिकेने मालमत्ता कराच्या संकलनावर लक्ष केंद्रित केले आहे. मोठ्या थकबाकीदारांवर आता पालिकेने लक्ष केंद्रित केले आहे.
------
थकबाकीची कारणे
न्यायप्रविष्ट प्रकरणे, नव्या करप्रणालीमुळे निर्माण झालेला संभ्रम, कराची थकबाकी, कर देयके देण्यास झालेला विलंब अशा अनेक कारणांमुळे मालमत्ता कराची थकबाकी वाढत गेल्याची माहिती कर निर्धारण व संकलन खात्याने दिली आहे.
बड्या थकबाकीदारांच्या मालमत्तांवर टाच आणा
सुमारे पाच हजार कोटी रुपये मालमत्ता कराची थकबाकी मोठ्या बिल्डरांकडे आणि मोठ्या व्यावसायिक आस्थापनांकडे आहे. ती तातडीने वसूल करा, अशी मागणी मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेते आणि भाजपचे नेते रवी राजा यांनी केली आहे.
-------
वर्षानिहाय थकबाकी
२०२१-२२ : ५,७९१ कोटी
२०२२-२३ : ५,५७५ कोटी
२०२३-२४ : ४,८५९ कोटी
२०२४-२५ : ५,२२९ कोटी
२०२५-२६ : ६,२०० कोटी (लक्ष्य)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

