चरईत १४ दुकानांचे शटर तोडले

चरईत १४ दुकानांचे शटर तोडले

Published on

चरईत १४ दुकानांचे शटर तोडले

ठाणे शहर, ता. १२ (बातमीदार) : चरई परिसरात १०० मीटरच्या परिघात तब्बल १४ दुकानांचे शटर तोडून चोरी झाल्याची घटना घडली आहे. सकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने १४ दुकानांचे शटर तोडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नौपाडा पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला असून, सीसीटीव्हीच्या आधारे त्याचा शोध घेतला जात आहे.

नौपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चरई परिसर पोलिस ठाण्यापासून काही अंतरावर आहे. नेहमी गजबजलेला रहिवासी आणि व्यावसायिक परिसर असणाऱ्या या परिसरात बुधवारी सकाळी (ता. १२) सहा ते साडेसहाच्या दरम्यान अवघ्या अर्ध्या तासात १४ दुकानांचे शटर तोडून अज्ञात चोरट्याने चोरी केली. १४ पैकी आठ दुकानांमध्ये चोरी करण्यात आली असून, चोरी गेलेल्या ऐवजाची किंमत २७,९५० रुपये असली तरी एकाच वेळी काही मिनिटांतच दुकाने फोडल्यामुळे परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. शटर तोडलेल्या दुकानांमध्ये डॉक्टरांचे क्लिनिक, आयुर्वेदिक दुकान, पेंट शॉप आणि सलून आदींचा समावेश आहे. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडून तपासण्यात आले असून, त्यामध्ये अज्ञात चोरटा शटर तोडताना आढळून आला. घटनास्थळी आरोपीच्या बोटांचे ठसे घेण्यात आले असून, सीसीटीव्हीच्या आधारे त्याचा शोध घेतला जात असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com