अनधिकृत डम्पिंग ग्राउंडला भीषण आग

अनधिकृत डम्पिंग ग्राउंडला भीषण आग
Published on

अनधिकृत डम्पिंग ग्राउंडला भीषण आग

अंबरनाथ ता. १२ (वार्ताहर) : नगरपालिकेच्या चिखलोली परिसरातील डम्पिंग ग्राउंडला बुधवारी (ता. १२) भीषण आग लागली. या आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले. या आगीची माहिती मिळताच अंबरनाथ, बदलापूर एमआयडीसी आणि उल्हासनगर अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान, परिसरात धुराचे लोट पसरल्याने स्थानिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

अंबरनाथ पश्चिमेला चिखलोली परिसरात पालिकेच्या वतीने डम्पिंग ग्राउंडची तात्पुरत्या स्वरूपात निर्मिती करण्यात आली होती; मात्र पालिकेने तयार केलेल्या या डम्पिंग ग्राउंडला बुधवारी दुपारच्या सुमारास भीषण आग लागली. दरम्यान, बाजूच्या सोसायटीतील कोणीतरी या डम्पिंग ग्राउंडच्या शेजारी असलेले सुकलेले गवत पेटविल्याने ही आग लागल्या असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, अग्निशमन दलाने शर्थीने प्रयत्न करून ही आग नियंत्रणात आणली; मात्र परिसरात धुराचे लोट पसरल्यामुळे त्यावर नियंत्रण मिळवण्याचे कार्य सुरूच आहे, अशी माहिती अग्निशमन दलाचे अधिकारी भागवत सोनेने यांनी दिली. या डम्पिंगला लागून रहिवासी भाग आहे तसेच मोठमोठ्या सोसायट्या आहेत. दरम्यान, या सोसायट्यांत राहणाऱ्या हजारो रहिवाशांना धुराचा मोठा त्रास होत असून, त्यांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com