मुंबईत प्रकल्पग्रस्तांसाठी १० हजार घरे
मुंबईत प्रकल्पग्रस्तांसाठी १० हजार घरे
भांडुप, मुलुंड, बोरिवली, प्रभादेवीत बांधकाम सुरू
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : पालिकेच्या विविध विकास योजनांमध्ये बांधित होणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना आता पर्यायी घरांचा मार्ग मोकळा होणार आहे. बाधित होणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना प्रत्येक सातही झोनमध्ये एकूण ५० हजार घरांचे बांधकाम केले जाणार आहे. सध्या भांडुप, मुलुंड, बोरिवली आणि प्रभादेवी येथे १० हजार घरांचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. २०२७ पर्यंत हे बांधकाम पूर्ण करण्याचे नियोजन महापालिकेचे आहे.
विविध विकास कामांमध्ये घरे बाधित झाल्यानंतर तेथील प्रकल्पग्रस्तांना इतर ठिकाणी पुनर्वसन करून तेथे पर्यायी घरे उपलब्ध करून दिली जातात. दुसऱ्या ठिकाणी जाण्यास प्रकल्पग्रस्त तयार होत नाहीत. माहुलमध्ये रासायनिक प्रकल्पामुळे तेथे मोठ्या प्रमाणात प्रदूषण असल्याने आरोग्याला घातक आहे. त्यामुळे तेथे पुनर्वसनाला प्रकल्पग्रस्तांचा तीव्र विरोध आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रत्येक झोनमध्ये घरे देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. सातही झोनमध्ये प्रत्येकी किमान पाच हजार घरे खासगी विकसकाच्या माध्यमातून बांधली जाणार आहेत. या योजनेत खासगी विकसक, जमीन मालक ३०० चौरस फुटांची घरे बांधून देणार आहे. सध्या भांडुप, मुलुंड, बोरिवली, प्रभादेवी येथे घरांचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. या घरांचे बांधकाम २०२७ पर्यंत पूर्ण केले जाणार आहे. एकूण ५० हजार घरांचे बांधकाम टप्प्याटप्प्याने केले जाणार आहे. प्रत्येक झोनमध्ये घरे उपलब्ध होणार आहे.
..........
कुठे किती घरे?
मुलुंड - ७,०००
भांडुप - १,५००
बोरिवली : १,१००
प्रभादेवी : ४००
..............
माहूलमध्ये जाण्यास विरोध
माहुलमध्ये प्रदूषण असल्याने तेथे जाण्यास प्रकल्पग्रस्तांचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे राहत्या ठिकाणाच्या जवळपास पुनर्वसन व्हावे, अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली आहे. त्यामुळे प्रत्येक झोनमध्ये घरे उपलब्ध करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. या योजनेत पालिकेच्या सातही झोनमध्ये किमान पाच हजारांवर घरे उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे प्रकल्पबाधितांना ते राहत असलेल्या ठिकाणाजवळच घरे उपलब्ध होणार आहेत. यामुळे प्रदूषणाचे कारण देत माहुलमध्ये जाण्यास होणारा विरोधही टळणार असून रखडलेले प्रकल्प मार्गी लागतील.
.............
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

