मुंबई-अहमदाबाद महामार्गावर कारचा अपघात
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर कारचा अपघात
कासा, ता. १४ (बातमीदार) : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर आंबोली गावच्या हद्दीत हॉटेल काठीयावाडीसमोर शुक्रवारी (ता. १४) सकाळी सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास एका कारचा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही.
मुंबईहून गुजरातच्या दिशेने जात असताना महामार्गावरील दुभाजकाच्या सिमेंटच्या बॅरिकेडला ही कार धडकली. अपघातानंतर स्थानिक पोलिसांनी आणि महामार्ग प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहन रस्त्याच्या कडेला हलवले. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही वेळातच सुरळीत करण्यात आली. ही घटना कासा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, या महामार्गावर नियोजन न करता दुरुस्तीची कामे सुरू असून, रस्त्यांवर कोणताही सूचनाफलक न लावता सिमेंट बॅरिकेड ठेवल्यामुळे असे अपघात होत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

