

आरोग्य व्यवस्थेसाठी शासन कटिबद्ध
आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांचे प्रतिपादन
पालघर, ता. १४ (बातमीदार) : जिल्ह्यातील आरोग्यसेवांचे बळकटीकरण करून आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. आबिटकर यांनी गुरुवारी (ता. १३) मनोर येथील ट्रॉमा केअर सेंटर, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाची पाहणी करत जिल्ह्यातील विविध आरोग्य संस्थांना भेटी दिल्या, त्या वेळी बोलत होते.
पालघर जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था गतिमान होणार असून, जिल्ह्यातील कुपोषणाच्या समस्याचा बारकाईने अभ्यास करून या समस्येवर मात करण्यासाठी आरोग्य विभाग सकारात्मक प्रयत्न करणार असल्याचे आबिटकर यांनी या वेळी सांगितले. मनोर येथील ट्रॉमा केअर सेंटर येत्या सहा महिन्यांत कार्यरत करण्यासाठी निधीची कमतरता भासणार नाही तसेच पद मान्यता व कर्मचारी अधिकाऱ्यांची उपलब्धता करून देणार असून, त्या दृष्टीने कालबद्ध कार्यक्रम हाती घेणार असल्याचे ते म्हणाले. या वेळी आमदार राजेंद्र गावित, विलास तरे, अनुसूचित जमाती आयोगाच्या सदस्या वैदेही वाढाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता देवेंद्र पवार, आरोग्य विभागाचे उपसंचालक अशोक नंदापुरकर, तहसीलदार रमेश शेंडगे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रामदास मराड, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश सुरडकर उपस्थित होते.
या वेळी आबिटकर म्हणाले की, ‘पालघर येथील जिल्हा सामान्य रुग्णालय उभारणीचे काम समाधानकारकरित्या सुरू असून, उपलब्ध झालेल्या वास्तू लवकरात लवकर वापरात आणून ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्यसेवा उपलब्ध करण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे, या रुग्णालयाच्या कामासाठी तसेच रुग्ण खाटांची संख्या वाढवण्यासाठी जवळपास ८० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात येणार आहे, पालघर जिल्ह्याला पुढील सहा महिन्यांत चांगल्या प्रकारच्या आरोग्य सुविधा मिळतील.’ या दोन्ही प्रमुख रुग्णालय तसेच आरोग्याशी संबंधित इतर समस्या सोडवण्यासाठी मंत्रालयात तत्काळ विविध विभागांची संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात येईल, असेही ते म्हणाले. जिल्ह्यातील आरोग्य समस्यांसंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींनी केलेल्या मागणीप्रमाणे निधी पुरविण्यात आला असून, भविष्यात आरोग्यसेवेसाठी निधीची कमतरता भासणार नाही, असे आश्वासनही त्यांनी या वेळी दिले.
...
प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी
जिल्हातील स्थानिक पातळीवरील आरोग्याविषयी समस्या जाणून घेण्यासाठी डहाणू येथील उपजिल्हा रुग्णालय, तारापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, आशागड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, कासा येथील उपजिल्हा रुग्णालय, सोंगटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची प्रत्यक्ष पाहणी करून रुग्ण आणि आरोग्य अधिकारी, कर्मचारी यांच्याशी आबिटकर यांनी चर्चा केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.