शिक्षिकेच्या घराला आग; बारावीच्या उत्तरपत्रिका जळून खाक

शिक्षिकेच्या घराला आग; बारावीच्या उत्तरपत्रिका जळून खाक

Published on

शिक्षिकेच्या घराला आग; बारावीच्या उत्तरपत्रिका जळून खाक

बोळिंज, ता. १४ (बातमीदार) : विरारमध्ये एका शिक्षिकेच्या घराला आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत घरी तपासणीसाठी बारावी वाणिज्य शाखेच्या आणलेल्या उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या आहेत. यात सुमारे १७० हून अधिक उत्तरपत्रिका जळून गेल्याने त्याचा विद्यार्थ्यांच्या निकालावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

विरार पश्चिमेच्या नानभाट रस्त्यावर असलेल्या गॉड ब्लेस बंगला येथे राहणाऱ्या एका शिक्षिकेने बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी घरी आणल्या होत्या. घरात कोणी नसताना सोमवारी (ता. १०) दुपारच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली होती. वसई- विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले; मात्र या आगीत घरातील साहित्यासह सोफ्यावर ठेवलेल्या बारावी वाणिज्य शाखेच्या उत्तरपत्रिकाही जळून खाक झाल्या. या प्रकाराची चित्रफीत प्रसारित झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली. यामध्ये १७० हून अधिक उत्तरपत्रिका नष्ट झाल्याची माहिती मिळत आहे. घटनास्थळाचा बोळिंज पोलिसांनी पंचनामा करून याची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com