दुचाकी अपघातात मामा भाच्याचा मृत्यू
दुचाकी अपघातात मामा- भाच्याचा मृत्यू
बोळिंज, ता. १४ (बातमीदार) : वसईजवळील भिणार गावातील मामा आणि भाच्याचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (ता. १४) घडली. प्रल्हाद माळी (वय २५) हे आपला भाचा मनोज जोगारी (वय २०) यांच्यासह होळी दहन करून घरी येत असताना त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात हे दोघांचा जागीच मृत्यू झाला. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भारोळ येथे हा अपघात झाला. प्रल्हाद व मनोज हे होळी दहनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी ढेकाले येथे गेले होते; होळीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर ते दुचाकीवरून घरी परत येत असताना त्यांची दुचाकी मुंबई- अहमदाबाद महामार्गावर भरोळ गावाजवळ आली होती. त्यावेळी त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले व ही दुचाकी संरक्षण भिंतीला धडकली. या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

