वाचनालय म्हणजे सरस्वतीचे मंदिर : हेमा मुंबरकर
वाचनालय म्हणजे सरस्वतीचे मंदिर : हेमा मुंबरकर
कल्याण, ता. १६ (वार्ताहर) : सध्याच्या धकाधकीच्या जीवनात १६० वर्षे अविरत वाचन परंपरा जपण्याचे कार्य सार्वजनिक वाचनालय करीत आहे. खरोखरच कौतुकास्पद आहे. त्याचबरोबर जागतिक महिलादिनानिमित्त महिलांच्या सुप्त कलागुणांना प्रोत्साहन देण्याचे कार्यही खूप मोलाचे आहे. सर्व महिलांनी सरस्वतीच्या या मंदिरातून विद्या संपादन करावी, असे प्रोत्साहनपर उद्गार पालिकेच्या सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी काढले. त्या सार्वजनिक वाचनालय कल्याण आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने पु. भा. भावे व्याख्यानमालेअंतर्गत कोण म्हणतं जमणार नाही? या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी केले. हा कार्यक्रम जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून आयोजित केला होता.
विज्ञानात प्रगती झाली आहे; मात्र माणसाच्या गरजा बदलल्या आहेत. जंकफूड, फास्टफूड खाण्याने पोट भरते, पण शरीर उपाशी राहते. परिणामी पोषक तत्त्वांच्या कमतरतेमुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळत आहे. आरोग्याच्या समस्या वाढतात, त्यासाठी महिलांनी आपल्या व आपल्या कुटुंबीयांच्या आहारात पौष्टिक अन्नघटकांचा समावेश केला पाहिजे, असे मार्गदर्शन निसर्गोपचारतज्ज्ञ डॉ. नीता संघवई यांनी उपस्थित महिलांना केले. सरचिटणीस भिकू बारस्कर यांच्या संकल्पनेतून “कोण म्हणतं जमणार नाही?” या स्पर्धेत १८ ते ७८ या वयोगटाच्या महिलांनी सहभाग घेतला होता.
कलागुणांचे सादरीकरण
महिला स्पर्धकांनी नृत्य, गायन, अभिनय, उखाणे पुस्तक-लेखक नावे या माध्यमातून कलागुणांचे सादरीकरण केले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक अनुराधा घाणेकर, द्वितीय क्रमांक रेश्मा कांबळे, तृतीय क्रमांक वैदेही पवार, उत्तेजनार्थ क्रमांक करुणा कल्याणकर आणि मिनल भदे यांनी पटकवला. स्पर्धेचे परीक्षण ज्येष्ठ कवी संतोष जाधव, सिनेनाट्य अभिनेत्री मेधा धर्माधिकारी – गवांदे व मनीषा चव्हाण यांनी केले. कार्यक्रमप्रसंगी वाचनालयाच्या उपाध्यक्षा आशा जोशी, चिटणीस निलिमा नरेगलकर, कार्यकारिणी सदस्या अमिता कुकडे, ग्रंथसेविका, महिला स्पर्धक उपस्थित होत्या. अत्यंत खेळीमेळीच्या व उत्साहाच्या वातावरणात स्पर्धा पार पडली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.