कसाऱ्यात ‘गाव तिथे ग्रंथालय’

कसाऱ्यात ‘गाव तिथे ग्रंथालय’

Published on

वात्सल्यचे ‘गाव तिथे ग्रंथालय’
शहापूर (बातमीदार): शिक्षण, आरोग्य, पर्यावरण आणि क्रीडा उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील वंचित घटकांच्या समस्या सोडवण्यासाठी ‘दि वात्सल्य फाउंडेशन’ संस्था कार्यरत आहे. या संस्थेच्या मदतीने कसाऱ्यातील थराचापाडा, कोळीपाडा, ढेंगणमाळ, सुसरवाडी आणि तेलमपाडा या जिल्हा परिषदेच्या पाच शाळांमध्ये ‘लेट्स रिड’ उपक्रम अंतर्गत वाचनालय सुरू करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्याचबरोबर अवांतर वाचनातून त्यांची जिज्ञासा वाढावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे अविनाश पाटील यांनी सांगितले. तसेच वाचून झालेली पुस्तके या उपक्रमासाठी देण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष तुषार वारंग यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com