

भेंडखळ वळणावर जीवघेणा खड्डा
अपघाताची भीती; तत्काळ रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी
उरण, ता. १७ (वार्ताहर) ः सिडको अखत्यारीत असणाऱ्या खोपटा पूल-नवघर मार्गावरील भेंडखळ वळणावर काही महिन्यांपासून जीवघेणा खड्डा निर्माण झाला आहे. या खड्ड्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. खड्ड्यामुळे अपघात होऊन जीवितहानी झाल्यास जबाबदार कोण, असा सवाल वाहनचालक करत आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने तत्काळ खड्डा बुजवून वाहनचालकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
उरण तालुका हा अनेक समस्यांच्या विळख्यात सापडला आहे. विशेष म्हणजे सिडको हद्दीत तर अनेक नागरी समस्यांमुळे स्थानिक हवालदिल झाले आहेत. तालुक्यातील बहुतेक ठिकाणी रस्त्यांची दुर्दशा असल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. विशेष म्हणजे खोपटा पूल ते नवघर अशा मुख्य रहदारीच्या मार्गावर द्रोणागिरी भागात प्रत्येक वळणावर रस्त्यावर भले मोठे खड्डे दिसून येत आहेत. तर भेंडखळ वळणावर सर्वाधिक मोठा असा खड्डा निर्माण झाला आहे. या खड्ड्यामुळे दुचाकीसह छोट्या वाहनांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. रात्रीच्यावेळी या रस्त्यावर जाताना वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे या मार्गावरील संबंधित मोठा खड्डा तत्काळ बुजविण्यात यावा, अशी मागणी दुचाकीसह वाहनचालकांकडून करण्यात येत आहे. यासंदर्भात सिडको नोडचे कार्यकारी अभियंता मोहन मुंडे यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
...........................
भेंडखळ वळणावर मोठी रहदारी असते. अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे, मात्र निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याने वळणावर खड्डा निर्माण झाला आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाकडून हा खड्डा तत्काळ बुजविण्यात यावा.
- सन्नी पाटील, वाहनचालक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.