

जाग्रवी सातपुतेचे परीक्षेत सुयश
किन्हवली (बातमीदार)ः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी, यासाठी एड्यूमीट अकॅडमी पहिली ते आठवीच्या मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी जानेवारीत भारत टॅलेंट सर्च अर्थात बीटीएस स्पर्धा परीक्षा घेत असते. या स्पर्धेसाठी शहापूर तालुक्यातील अल्याणी शैक्षणिक केंद्रातील अस्नोली येथील जिल्हा परिषदेच्या उच्च माध्यमिक शाळेतील सुमारे ९५ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. या परीक्षेत जाग्रवी सातपुतेने १५० पैकी १४८ गुण मिळवून राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. शहापूर तालुका बीटीएस परीक्षा समन्वयक ज्योती बेलवले, मुख्याध्यापक अरुण शिर्के, सहशिक्षिका सरीता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.