

नामांकित व्यावसायिक निवेदकांचे स्नेहसंमेलन आणि मार्गदर्शन शिबिर
धारावी, ता. १८ (बातमीदार) : गजबजलेल्या उत्सवप्रिय आपल्या महाराष्ट्रात अनेक कार्यक्रमात व्यावसायिक निवेदक किंवा सूत्रसंचालकाची गरज भासते. तो सहज उपलब्ध व्हावेत, कामाची आणि विचारांची देवाणघेवाण व्हावी, या उदात्त हेतूने विजय कर्जावकर या तरुणाने ‘कट्टा निवेदकांचा’ या नावाचा व्हाॅट्सॲप ग्रूप बनवला आहे. जवळपास १४५ हून अधिक व्यावसायिक निवेदक या ग्रुपचे सदस्य आहेत. सर्वच प्रकारच्या कार्यक्रमासाठी निवेदक इथे अगदी एका मेसेजवर उपलब्ध होतात. रविवारी (ता. १६) कोहिनूर हाॅल येथे या सर्व मंडळीचे स्नेहसंमेलन व मार्गदर्शन शिबिर पार पडले. मुंबईतील ५० हून अधिक व्यावसायिक निवेदक अगदी वेळात वेळ काढून उपस्थित होते.
सकाळी गणेश पूजन व सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर अनेक दिवंगत ज्येष्ठ निवेदकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. व्यावसायिक सूत्रसंचालक, गाण्याच्या कार्यक्रमाचा सुसंवादक, क्रीडा समालोचक, राजकीय निवेदक यांचा आपसात छान परिचय झाला. यातील बरेचसे निवेदक नोकरी करीत आहेत.ज्येष्ठ निवेदक संदीप कोकीळ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. साधकबाधक चर्चा व सोबत प्रश्र्नोत्तराचा तास झाला. निवेदकांसाठी महाराष्ट्र बाजारपेठ आणि स्वरिता आर्टस यांच्या माध्यमातून लकी ड्राॅ काढण्यात आला. विजेत्याना भरघोस बक्षिसे देण्यात आली. गाण्यावर ताल धरत निवेदकांनी आपली नृत्याची हौसही भागवून घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.