

मुलुंडमधील शालेय परिसर तंबाखूमुक्त करण्याचा निर्धार
मुलुंड, ता. १८ (बातमीदार) ः परिमंडळ सातचे पोलिस उपायुक्त विजयकांत सागर यांच्या मार्गदर्शनाखाली १०० मीटर शालेय परिसर तंबाखूमुक्त करण्याच्या उद्देशाने एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमांतर्गत नवघर पोलिस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या १० शाळा आणि आठ महाविद्यालयांमधील १०० मीटर परिसर तंबाखूमुक्त करण्यात आले आहेत.
हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. शालेय परिसरात तंबाखूजन्य पदार्थांचा वापर बंद केल्याने विद्यार्थ्यांचे स्वास्थ्य संरक्षित राहील, तसेच शालेय वातावरण अधिक सुरक्षित आणि निरोगी बनेल. तंबाखूच्या दुष्परिणामांविषयी जागरूकता निर्माण होऊन युवा पिढीला त्याचे गंभीर परिणाम समजून येतील. या उपक्रमाचे नेतृत्व नवघर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश मदने, महिला पोलिस उपनिरीक्षक धनश्री कदम, मिल स्पेशल संदीप पाटील, सामाजिक कार्यकर्त्या मयुरा बाणवली यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.