औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी निदर्शने

औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी निदर्शने
Published on

वाशी, ता. १८ (वार्ताहर) : औरंगजेबाची कबर उखडून काढण्याच्या मागणीसाठी बजरंग दलाच्या वतीने वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सोमवारी (ता. १७) सायंकाळी निदर्शने करण्यात आली. या वेळी छत्रपती शिवाजी महाराज तसेच छत्रपती संभाजी महाराजांचा जयघोष करत औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातून काढून टाकण्याची मागणी बजरंग दल आणि इतर हिंदू संघटनांकडून करण्यात आली.
औरंगजेबाने अखंड भारतात हिंदूद्वेषाची परंपरा चालवली, मंदिरे उद्ध्वस्त केली. महिलांचा छळ केला. अशा परकीय आक्रमकाची कबर हिंदुस्थानात असणे ही मानसिक गुलामी आहे. त्यामुळे विश्व हिंदू परिषदअंतर्गत बजरंग दलाच्या वतीने राज्यभरात राज्यव्यापी आंदोलने, निदर्शने करण्यात आली. राज्य सरकारने या आंदोलनाची लवकरात लवकर दखल घेऊन कारवाई करावी अन्यथा कारसेवा करून कबरीवर कारवाई करण्यास बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद सक्षम असल्याचे हिंदू संघटनांकडून सांगण्यात आले. या वेळी हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे या निदर्शनात उपस्थित राहून औरंगजेबाचा निषेध केला. औरंगजेबाच्या कबरीवर शौचालय बनवावे, अशी मागणी हिंदू संघटनांकडून करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com