भाजप कार्यकर्त्याच्या घरातून पिस्तुलच्या १४ गोळ्यांची चोरी

भाजप कार्यकर्त्याच्या घरातून 
पिस्तुलच्या १४ गोळ्यांची चोरी
Published on

अंबरनाथ, ता. १८ (वार्ताहर) : भाजप कार्यकर्त्याच्या घरात घरफोडीमध्ये चोरट्यांनी परवानाधारक पिस्तूलच्या १४ गोळ्या (बुलेट्‍स) आणि ७२ हजारांची रोकड लंपास केली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

अंबरनाथ पूर्वेला गुरुकृपा अपार्टमेंटमध्ये भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते, व्यावसायिक नंदकुमार गोविंद दलाल (वय ६८) हे राहतात. त्यांनी स्वतःच्या संरक्षणासाठी परवानाधारक पिस्तूल घेतले आहे. ते परिवारासह शनिवारी (ता. १५) बाहेरगावी गेले होते. याच संधीचा फायदा घेऊन चोरट्यांनी दलाल यांच्या घराचे दरवाजे तोडून आत प्रवेश करत कपाटाच्या लॉकरमधून एकूण ७२ हजार ५०० रुपये आणि पिस्तूलच्या १४ गोळ्या लंपास केल्या. या प्रत्येक गोळीची किंमत सुमारे अडीच हजार रुपये आहे. सोमवारी (ता. १७) घरी परतल्यानंतर घराचे दरवाजे तुटलेल्या अवस्थेत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. दरम्यान, पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश पाटील यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com