चाकरमान्यांचा रविवारी कळव्यात शिमगोत्सव

चाकरमान्यांचा रविवारी कळव्यात शिमगोत्सव
Published on

कळवा, ता. १८ (बातमीदार)ः कोकणातील चाकरमान्यांमध्ये गणेशोत्सव, शिमगोत्सवाला आगळे-वेगळे महत्त्व असते. ठाणे-मुंबईतून सणानिमित्त कोकणात जाणाऱ्यांची संख्या अधिक असते, मात्र काही कारणांनी ज्यांना गावी जाणे शक्य होत नाही, त्यांच्यासाठी ‘संघर्ष’ संस्थेच्या वतीने कळवा येथे डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी शिमगोत्सवासह भव्य पालखी नृत्य स्पर्धा होणार आहे.
कळव्यातील भूमिपुत्र मैदानात खारलँड-कळवा येथे कोकणचा शिमगोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. या सोहळ्यात रत्नागिरीतील उक्षी गावाची जागृत ग्रामदेवता देवी वाघजाई मातेची पालखी, देवीचा कौल घेण्यात येणार आहे. यानिमित्ताने होणाऱ्या पालखी नृत्य स्पर्धा सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. या स्पर्धेत रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील नामवंत पालखी नृत्य संघ सहभागी होणार आहेत. यानिमित्ताने कोकणातील पालखी उत्सव, देखाव्यांसह पारंपरिक पालखी नृत्य ठाणेकरांना अनुभवता येणार आहे.
--------------------------------------------------
महिला पथकाचा प्रथमच सहभाग
रत्नागिरीतील आंबेशेत येथील महिला पथक प्रथमच पालखी नृत्य सादर करणार आहे. स्पर्धेतील विजेत्याला एक लाख ५१ हजार रुपये व आकर्षक चषक; द्वितीय विजेत्यास एक लाख एक हजार रुपये व आकर्षक चषक; तृतीय विजेत्या संघाला ५१ हजार रुपये व आकर्षक चषक, तर सर्व सहभागी संघांना प्रत्येकी २५ हजारांचे उत्तेजनार्थ पारितोषिक, सन्मानचिन्ह देण्यात येणार असून, रविवारी (ता. २३) दुपारी चार वाजता सोहळा होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com