

पनवेल, ता. १८ (वार्ताहर) : नवीन पनवेलमधील सिडकोच्या मोकळ्या जागेत डेब्रिज टाकण्यासाठी आलेले सहा डम्पर सिडकोच्या पथकाने पोलिसांच्या मदतीने पकडण्याची कारवाई सोमवारी (ता. १७) दुपारी नवीन पनवेलमध्ये केली. या कारवाईत पोलिसांनी डम्पर जप्त करून सर्व चालकांना ताब्यात घेतले. पनवेल शहर पोलिसांनी या सर्वांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सोमवारी दुपारी नवीन पनवेल सेक्टर २० भागातील सिडकोच्या भूखंड क्रमांक एक व आठवर रेबीट, माती व दगड असे मानवी आरोग्यास धोकादायक असलेले डेब्रिज टाकण्यासाठी काही डम्पर आले होते. याबाबतची माहिती सिडकोच्या पथकाला मिळाल्यानंतर सिडकोच्या पथकाने सेक्टर २० मध्ये जाऊन पाहणी केली असता, सहा डम्परचालक त्या ठिकाणी डेब्रिज टाकत असल्याचे आढळून आले. त्यामुळे सिडकोच्या पथकाने पोलिसांच्या मदतीने डेब्रिजने भरलेले डम्पर व त्याच्यावरील चालक खुर्शाद अन्सारी, आशीष कश्यप, दत्ता चव्हाण, मदन औसरमल, राकेश केवट व गौरव महातोर या सहा जणांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर पनवेल शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.