

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १८ : शहरात आधीच अधिकृत पार्किंगची बोंब, त्यात बेवारस वाहनांची भर अशी अवस्था ठाण्याची झाली आहे. रुंद केलेल्या रस्त्यांवर विशेषत: सेवा रस्त्यांवर बेवारस, भंगार गाड्यांनी तळ ठोकल्यामुळे सकाळ-संध्याकाळी वाहतूक कोंडीचा सामना चालकांना करावा लागतो. त्यामुळे ही भंगार, बेवारस वाहने तत्काळ हटवून त्यांना ठेवण्यासाठी जागा शोधण्याचे आदेश पालिका आयुक्त सौरभ राव यांनी अतिक्रमण विभागाला दिले आहेत.
ठाणे शहर सध्या कचरा कोंडीने गाजत आहे. एकीकडे शहरातील रस्ते कचऱ्याने व्यापून गेले आहेत. त्यात अधिकृत वाहनतळाची बोंब असल्याने रस्त्यांवर पार्किंग करून ठेवलेल्या वाहनांची संख्या वाढत आहे. भंगार गाड्यांनीही रस्ते अडवल्यामुळे या समस्येत आणखी भर पडत आहे. सध्या ठाण्यात मेट्रोसह काही पुलांच्या उभारणीचे काम सुरू आहे. त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी सकाळ-संध्याकाळ वाहतूक कोंडीत भर पडते. ही समस्या दूर करण्यासाठी पालिकेने पुन्हा बेवारस वाहनांना रडारवर घेतले आहे.
वास्तविक अशा मोहिमा यापूर्वीही राबवण्यात आल्या होत्या. जप्त केलेले भंगार बेवारस वाहने ठाण्यातील बाटा कंपाउंड येथे ठेवण्यात आल्या. काही वर्षांपूर्वी शहरातील बेवारस वाहनांचा लिलावही करण्यात आला होता. आता तशीच मोहीम पुन्हा उघडण्यात आली. ठाणे पालिका आयुक्त सौरभ राव यांनी घेतलेल्या बैठकीत शहरातील रस्ते मोकळे करण्यासाठी बेवारस वाहने उचलण्याची कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच अतिक्रमण विभागाने कारवाई करून उचलून आणलेल्या वाहनांचा सरकारमान्य पद्धतीने लिलाव करून ती वाहने ठेवलेल्या जाग्या तत्काळ मोकळ्या कराव्यात, अशा सूचना दिल्या आहेत.
जागा शोधण्याचे निर्देश
कारवाई केलेल्या बेवारस वाहने ठेवण्यासाठी जागा अपुरी पडत असल्याने ती वाहने ठेवण्यासाठी आणखी जागा शोधावी, असे निर्देश आयुक्त राव यांनी अतिक्रमण विभागाला दिले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.