

उरण, ता. १८ (वार्ताहर) : गेली अनेक वर्षे नियमित मिळणारा पाणीपुरवठा बंद केल्याच्या निषेधार्थ आणि न्यायासाठी परदेशी कुटुंबातील ८९ वर्षीय अनंत रामजीवन परदेशी यांनी आपल्या कुटुंबियांसोबत सोमवारपासून (ता. १७) उरण पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
परदेशी कुटुंब गेल्या ३८ वर्षांपासून हनुमान कोळीवाडा ग्रामपंचायत हद्दीत राहत आहेत; मात्र ग्राम आरोग्य पाणीपुरवठा समितीने त्यांच्या घराचा पाणीपुरवठा बेकायदा बंद केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. न्यायालयाच्या आदेशानंतरही प्रशासन कारवाई करत नसल्याने परदेशी कुटुंबाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्थानिक प्रशासनाने परदेशी कुटुंबाला संयम बाळगण्यास सांगितले असले, तरी पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. ग्रामपंचायत प्रशासक, गटविकास अधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेच्या निषेधार्थ अनंत परदेशी यांनी उपोषणाचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात अधिकाऱ्यांनी पोलिस कारवाईचे आदेश दिले असतानाही कोणतीही कारवाई झालेली नाही. परिणामी, आम्हाला न्याय मिळवण्यासाठी उपोषणाशिवाय पर्याय उरला नसल्याचे अनंत परदेशी यांनी सांगितले. प्रशासनाने तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करावा आणि संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि परदेशी कुटुंबाने केली आहे. परदेशी कुटुंबिय उपोषणाला बसल्यानंतर तातडीने पोलिस प्रशासनाने या बाबत बैठक घेतली आणि तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.