कचराकोंडीविरोधात काँग्रेस आक्रमक

कचराकोंडीविरोधात काँग्रेस आक्रमक
Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १८ ः शहरात उद्भवलेली कचरा समस्या सोडवण्यास पालिका प्रशासन अपयशी ठरल्याने ठाणेकरांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आक्रमक झालेल्या काँग्रेसने गुरुवारी पालिका मुख्यालयाबाहेर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
ठाणे शहरातील कचरा उपसण्याचे काम सुरू असल्याचा दावा महापालिका करत आहे. पण आजही शहरातील रस्ते, रहिवासी सोसायट्यांमध्ये कचऱ्याचे ढीग लागले आहेत. दहा दिवसांपासून कचरा जैसे थे अवस्थेत आहे. सी.पी.तलाव येथे कचऱ्याचे डोंगर तयार झाले असून दोन वेळा लागलेल्या आगीचा धूर अजूनही धुमसत असल्याने रहिवाशांचा संताप वाढला आहे. कचरा टाकण्यास विरोध असतानाही येथे घंटागाड्या रिकाम्या केल्या जात आहेत. पण सत्ताधाऱ्यांना गेल्या ३० वर्षांत स्वतःची कचराभूमी विकसित करता आलेली नाही. त्यामुळे ठाणे काँग्रेसच्यावतीने याविरोधात आक्रमक पवित्रा घेताना पालिका मुख्यालयाबाहेर धरणे आंदोलनाचा इशारा दिला आहे.
------------------------------------
सत्ताधाऱ्यांची फक्त आश्वासने’
ठाणे महापालिकेत कित्येक वर्षे सत्ताधारी आश्वासने देण्याशिवाय काहीच करत नाही. त्यांच्या नाकर्तेपणामुळे महापालिकेला स्वतःची कचराभूमी नाही. शहराची कचराकुंडी झाली असून रोगराई पसरण्याची भीती आहे, असा आरोप ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेतून केला आहे. यावेळी ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे, हिंदूराव गळवे, रवी कोळी, महिंद्र म्हात्रे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com