उन्हामुळे ट्रकखाली झोपणे बेतले जीवावर

उन्हामुळे ट्रकखाली झोपणे बेतले जीवावर
Published on

नवी मुंबई, ता. १८ (वार्ताहर) : उन्हामुळे रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकच्या सावलीत झोपलेल्या एका व्यक्तीचा ट्रकच्या चाकाखाली येऊन मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (ता. १७) दुपारी एपीएमसीत घडली. या अपघातातील ट्रकचालकाने ट्रकच्या खाली कुणी असल्याची खातरजमा न करता आपला ट्रक चालवून नेल्यामुळे अपघात घडल्याचे आढळून आले आहे. त्यानुसार एपीएमसी पोलिसांनी ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या दुर्घटनेत मृत झालेल्या व्यक्तीचे नाव पांडुरंग बापू पाटील (४७) असे असून, ते मूळचे सांगली जिल्ह्यातील असून, सध्या ते कोपरी गाव सेक्टर २६ येथे राहण्यास होते. ते एपीएमसीमध्ये हमाल म्हणून काम करत होते. सोमवारी दुपारी १२ ते १ या कालावधीत उन्हाचा पारा वाढल्याने पांडुरंग पाटील हे एपीएमसीतील माथाडी सर्कल ते पुनीत कॉर्नरकडे जाणाऱ्या रस्त्यावर दाणा मार्केट गेट नंबर तीन एम गेटच्या बाहेर रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकच्या खाली झोपले होते. यादरम्यान, ट्रकचालकाने आपल्या ट्रकच्या पाठीमागे व आजूबाजूला पाहणी न करता, निष्काळजीपणे ट्रक चालू करून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ट्रकच्या खाली झोपलेले पांडुरंग पाटील हे ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर एपीएमसी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, ट्रकचालकाच्या निष्काळजीमुळे पांडुरंग पाटील यांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. त्यानुसार पोलिसांनी ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com