

मढ परिसरात कमी दाबाने पाणी
पाच ते सहा महिन्यांपासून रहिवासी त्रस्त
मालाड, ता. १८ (बातमीदार) ः मालाड पश्चिमेतील मढ, शिवाजीनगर परिसरात कमी दाबाने पाणी येत आहे. दिवसातून फक्त रात्री ९ ते ११.३० पर्यंत पाणी सोडण्यात येत असल्याने रहिवाशांना पाण्यासाठी धावपळ करावी लागते.
मढ येथील शिवाजीनगर प्रवेशद्वार क्रमांक दोन या परिसरातील रहिवाशांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. रात्री पाणी आल्यानंतर हातातली सर्व कामे बाजूला ठेवून रहिवाशांना पाणी आणण्यासाठी जावे लागते. येथील रहिवाशांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. तब्बल एक ते दोन किलोमीटर अंतरावर हंडे, कळशी, डब्बे घेऊन लहानगे, ज्येष्ठ नागरिकांना चालत पाणी आणण्यासाठी जावे लागते. पिण्याचे पाणी मुबलक नसल्याने विकतचे पाणी घेण्याची वेळ रहिवाशांवर आली आहे. त्यामुळे रहिवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
मढ परिसरातील सामाजिक संस्था, संघटनांनी पालिकेच्या पी उत्तर विभागातील पाणी खाते, पालिकेचे सहाय्यक आयुक्त, स्थानिक आमदार अस्लम शेख यांना पत्र देऊन पाण्याची समस्या लवकरात लवकर सोडवावी, अशी विनंती केली आहे, मात्र पाच ते सहा वर्षे उलटली तरी काहीच सुधारणा झालेली नाही. पाण्याचा दाबही वाढवण्यात आला नसल्याने स्थानिक रहिवासी हतबल झाले आहेत.
पाच ते सहा हजार लोकवस्ती
या विभागातील जवळपास पाच ते सहा हजार लोकवस्ती आहे. घाण पाणी आणि कमी दाबामुळे रहिवाशांच्या आरोग्यावरदेखील परिणाम होत आहे. त्यामुळे पालिकेने गांभीर्याने घेऊन ही समस्या सोडवावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.
मागील पाच ते सहा महिन्यांपासून आमच्या वस्तीत पाण्याचा दाब कमी असल्याने मुबलक पाणी मिळत नाही. याबाबत पालिकेत तक्रार करूनही दखल घेतली जात नाही. त्यामुळे आम्ही हतबल झालो आहोत.
-आमिर सय्यद, सामाजिक कार्यकर्ता
मागील तीन वर्षांपासून पाण्याची समस्या सतावत आहे. घाण आणि कमी दाबाने पाणी येत असल्याने पाण्यासाठी पैसे मोजावे लागत आहेत. कधीकधी पाण्यासाठी कामाचा खाडाही करावा लागतो. त्यामुळे आर्थिक नुकसान होत आहे.
-बिलकीस पटेल, स्थानिक रहिवासी
पाण्यासाठी दूरवर फिरूनही मुबलक पाणी मिळत नाही, मात्र आजूबाजूच्या इमारतींना भरपूर पाणी मिळते. अशा प्रकारे आमच्यावर अन्याय सुरू आहे.
- रूपा सिंग, स्थानिक रहिवासी
फोटो: बिलकीस पटेल (सफेद ओढणी धारण केलेली)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.