बेलापूर, नेरूळमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई

बेलापूर, नेरूळमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई
Published on

वाशी, ता. १८ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण पथकांच्या वतीने बेलापूर व नेरूळ विभाग कार्यालयामध्ये सुरू असणाऱ्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली. महापालिकेने अनधिकृत बांधकामांना नोटीस देऊनही संबंधितांनी अतिक्रमण न हटवल्याने ही कारवाई करण्यात आली. नेरूळ सेक्टर आठमध्ये एनएनएल १/ए -९/७ मध्ये आनंदा शेलार यांच्याकडून तीन मजली आरसीसी बांधकाम करण्यात येत होते. या बांधकामावर नेरूळ विभागाचे सहाय्यक आयुक्त जयंत जावडेकर, कनिष्ठ अभियंता संजय सोनटक्के व अतिक्रमण विभागातील कर्मचारी, पोलिसांनी १० मजूर, दोन अधिकारी, दोन ब्रेकरच्या साह्याने कारवाई करण्यात आली. त्याचप्रमाणे बेलापूर विभागात सेक्टर १५ येथील भूखंड क्रमांक ३७ येथे मनिष कुकरेजा याच्याकडून अनधिकृत बांधकाम करण्यात येते होते. या कारवाईसाठी बेलापूर कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त डॉ. अमोल पालवे, कनिष्ठ अभियंता आत्माराम काळे, बेलापूर विभागातील अधिकारी/कर्मचारी, १० मजूर, दोन हॅमर, एक गॅस कटर तसेच अतिक्रमण विभागाकडील पोलिस तैनात होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com