जिल्हास्तरीय स्पर्धेत बारा पदके

जिल्हास्तरीय स्पर्धेत बारा पदके
Published on

ठाणे, ता. १५ : ठाणे बॅडमिंटन अकादमीतील खेळाडूंनी भिवंडीतील जिल्हास्तरीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेमध्ये १२ पदकांवर मोहर उमटवली. गतवर्षी याच ठिकाणी तब्बल १० पदके पटकावून ठाणे बॅडमिंटन अकादमीच्या खेळाडूंनी वर्चस्व गाजवले होते.
ठाणे महापालिकेच्या दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहातील खंडू रागणेकर बॅडमिंटन हॉल येथील ठाणे बॅडमिंटन अकादमीमध्ये केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण देशातील विविध राज्यातील अनेक खेळाडू बॅडमिंटनमध्ये भविष्य घडवण्यासाठी मेहनत घेत असतात. गेली ३७ वर्षे या माध्यमातून राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडले आहेत. भिवंडीत झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेतही उपांत्य फेरीच्या लढतीत त्याने ठाणे बॅडमिंटन अकादमीतील यज्ञेश वारघडेचा १५-२, १५-५ असा सहज पराभव करीत अंतिम फेरीत धडक मारली, तर अंतिम फेरीत प्रितेश भोयेवर १५-११, १५-८ असा विजय साकारत सुवर्णपदक पटकावले आहे. १५ वर्षांखालील मुलांच्या एकेरीच्या विभागातदेखील अल्फीने ब्राँझपदक पटकावले, तर याच गटात चंद्रांशू गुंडले याने रौप्यपदक, १३ वर्षांखालील मुलींच्या विभागात शनाया तवातेने ब्राँझपदकाला गवसणी घातली आहे. तसेच १५ वर्षांखालील मुलींच्या गटात शुभ्रा कुलकर्णीने ब्राँझपदक पटकावले आहे.
--------------------------------
तनय, यशचे घवघवीत यश
भिवंडी येथील स्पर्धेत पुरुष एकेरी विभागात तनय जोशीने दिमाखदार कामगिरी केली आहे. अंतिम फेरीच्या लढतीत सार्थक वाडेकर याच्यावर अटीतटीच्या सामन्यात त्याने २१-११, २१-१८ अशी मात केली होती, तर पुरुष दुहेरी विभागामध्ये तनयने ब्राँझपदक पटकावले आहे. या गटात अद्वैत कर्नाटकीने ब्राँझपदक, तर यश ढेंबरेने सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धेत एकूण तीन पदके पटकावणारा तनय जोशी हा एकमेव खेळाडू ठरला, तर यश ढेंबरेने सलग दुसऱ्यांदा अजिंक्यपदावर नाव कोरले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com